मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले सपत्नीक केदारनाथाचे दर्शन; मोदींप्रमाणे गुहेत करणार का ध्यानसाधना ?
केदारनाथ: दिनांक २१ ला विधानसभा निवडणुकांसाठीच मतदान झालं आणि गेले महिनाभर प्रचारात व्यस्त असलेल्या उमेदवार आणि नेत्यांना जरा उसंत मिळाली. मुळात निकाल उद्याच म्हणजेच २४ लाच लागणार आहेत त्यामुळे या साऱ्यांना दूर कुठे फिरायला जाणे शक्य नाही. अशीच एक दिवसाची सुट्टी काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या अर्धांगीनी अमृता फडणवीस यांनी गाठलं थेट केदारनाथ. आज सकाळी त्यांनी केदारनाथाचं दर्शन घेतलं आणि आशीर्वाद घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्याच्या एक दिवस आधी अशाच प्रकारे केदारनाथाचं दर्शन घेत एक रात्र गुहेत काढली होती. या वेळी त्यांनी मोठ्या अवधीसाठी ध्यानसाधना केली होती. आता देवेंद्र फडणवीसही या गुहेत ध्यानसाधना करतात का ते पाहणे लक्षणीय ठरेल.
