दादा सौरव गांगुलीची झाली बीसीसीआय च्या अध्यक्षपदी निवड
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार क्रिकेट विश्वातील दादा सौरव गांगुली याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तो ३९ वा अध्यक्ष झाला आहे.
गेल्या ३३ महिन्यांपासून प्रशासकीय समिती ‘बीसीसीआय’ चं काम पाहत होती. पण आज नवी समिती निवडून आल्यानंतर अध्यक्ष पदी सैरव गांगुली ची वर्णी लागली. एकेकाळी याच बीसीसीआय च्या अध्यक्षपदी राहीलेल्या दालमिया यांच्याशी सौरव गांगुलीचा टोकाचा वाद झाला होता आणि यानंतर त्याला आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पण आज दादा ने हे पद मिळवत पुराना हिसाब चुकता केला इतकं नक्की.
बीसीसीआय च्या नव्या समितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह यांची सचिव पदी वर्णी लागली आहे. याचसोबत उत्तराखंड चे महिम शर्मा नवे उपाध्यक्ष तर अरुण धुमल खजिनदार आणि जयेश जॉर्ज यांची संयुक्त सचिव पदी निवड झाली आहे.