केंद्र सरकारचे ४८.६६ लाख कर्मचारी आणि ६६.५५ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
नवी दिल्ली, दि. २८: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (डीए) आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाई दिलासा (डीआर) निधीचा अतिरिक्त हप्ता ०१.०१.२०२५ पासून निर्गमित करायला मंजुरी दिली. महागाईची भरपाई करण्यासाठी मूळ वेतन/निवृत्तीवेतनच्या सध्याच्या ५३ % दरात ही २% वाढ करण्यात आली आहे.
महागाई भत्ता आणि महागाई दिलासा या दोन्हींमध्ये वाढ झाल्यामुळे सरकारी तिजोरीवर वर्षाला एकूण ६६१४.०४ कोटी रुपयांचा भार पडणार आहे. केंद्र सरकारचे ४८.६६ लाख कर्मचारी आणि ६६.५५ लाख निवृत्तीवेतनधारकांना याचा लाभ मिळणार आहे. ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित स्वीकृत सूत्रानुसार आहे.
