Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

दादर फूलमार्केटजवळील पूल सुरक्षेच्या दृष्टीने ९० दिवस बंद राहणार

दादर फूलमार्केटजवळील पूल सुरक्षेच्या दृष्टीने ९० दिवस बंद राहणार

सप्टेंबर २०१७ मध्ये एल्फिन्स्टन रोड स्थानकावरील चेंगराचेंगरी व जुलै २०१८ मधील अंधेरी येथे कोसळलेला पादचारी पूल या दोन घटनांनंतर मुंबईतील पादचारी पुलांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर दादर स्थानकातील पश्चिम रेल्वेचा प्लॅटफॉर्म क्रमांक दोन आणि तीनवरुन फुल बाजारात जाणारा पूल बंद करण्यात आला आहे.

पश्‍चिम रेल्वे मार्गाजवळील दादर फूलमार्केट येथील पादचारी पुलाचे दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आल्याने हा पूल रविवारपासून पादचार्‍यांसाठी बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक पूलदुरुस्तीचा निर्णय घेण्यात आल्याने प्रवाशांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. यामुळे दक्षिणेकडील पुलावर मात्र प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे.

रविवार, १७ मार्चपासून या पुलाचे काम हाती घेण्यात आल्याने हा पूल पादचार्‍यांसाठी पुढील ९० दिवस बंद राहणार आहे. प्लॅटफॉर्म १, २ आणि ३ येथील भाग दुरुस्तीसाठी घेतला असल्याने पुढील काळात पूर्व-पश्‍चिम जाण्यासाठी पादचार्‍यांना रेल्वेच्या दक्षिण पुलाचा वापर करण्यास मुभा देण्यात आली. पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील प्रवाशी संख्या पाहता दादर स्थानकातील मुख्य पुलावर प्रवाशांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *