मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर युतीचे मेळावे रद्द
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे काल रात्री कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ६३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
मनोहर पर्रिकर यांच्या निधनाची बातमी समजताच शिवसेना-भाजपने आपले पुणे आणि नवी मुंबईतील आजचे मेळावे रद्द केले आहेत.
आज सोमवार, १८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता पर्रिकर यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.