Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनचे नवी मुंबईकरांना स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन

कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनचे नवी मुंबईकरांना स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन

नवी मुंबईतील म्युनिसिपल कामगारांनी समस्त नवी मुंबईकरांना कोरोना विषाणूच्या संसर्गापासून स्वतःचे व परिवाराचे रक्षण करण्यासाठी विनाकारण प्रवास न करण्याचे व स्वयंशिस्त लावण्याचे आवाहन केले आहे.

सविस्तर आवाहन वाचा

सर्व कामगारांच्यावतीने नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियन सर्व नागरिकांना आवाहन करीत आहे की, आम्ही सर्व अत्यावश्यक सेवेतील कंत्राटी कामगार आमच्या जीवाची पर्वा न करता “कोरोना” वायरस च्या युध्दात विजय मिळवण्यासाठी, आपल्याला ह्या विषाणू ची बाधा होऊ नये म्हणून आपल्या परीसराची स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी उचलत आहोत. तरी कृपया आपण पुढील संभाव्य धोका टाळण्यासाठी कोणीही विनाकारण घराबाहेर येऊ नये. आपल्यामुळे किंवा इतरांमुळे कोणालाही हा संसर्ग होऊ याची काळजी सर्वांनी घ्यावी. नागरीकांनीही कामगारांना सहकार्य करा. उघड्यावरील अन्न खाऊ नका. हस्तांदोलन करु नका सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नका. थुंकु नका. आपले हात स्वच्छ ठेवा. आपणासोबत इतरांनाही ह्या मोहीमेत सहभागी करुन घेऊन देशावर आलेल्या संकटाला हसत हसत सामोरे जाऊया. आपल्या देशाची सुरक्षितता आपल्याच हातात आहे.

कामगारांनीही स्वतःची काळजी घ्यावी. हीच वेळ आहे सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची ह्या “कोरोना” ला हाकलुन देण्याची ..कोणत्याही आजारी कामगारांनी ह्या मोहीमेत सहभागी होऊ नये ही विनंती.
जनहितार्थ जारी.

– नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियन, नवी मुंबई महानगर पालिका कंत्राटी कामगार

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *