काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर भाजपच्या वाटेवर?
सातारा: लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसला आज आणखी एक धक्का बसला आहे. काँग्रेसचे साताऱ्यातील नवनियुक्त जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती रणजितसिंह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये दाखल झालेले माजी खासदार रणजितसिंह -पाटील यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. आता मात्र माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.
मात्र माढ्यातून नक्की कोणाला उमेदवारी मिळेल हे येत्या काळातच ठरणार आहे.
