नॅशनल हेरॉल्ड कथित मनी लाँड्रिगप्रकरणी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना नोटीस
नवी दिल्ली, दि. २: नॅशनल हेरॉल्ड कथित मनी लाँड्रिगप्रकरणी दिल्लीच्या रोऊज एव्हेन्यू न्यायालयाने काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना आज नोटीस निर्गमित केली. सोनिया गांधी आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिग प्रतिबंधक कायद्याखाली ईडी, अर्थात सक्तवसुली संचालनालयाने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल का घेऊ नये, याची कारणं स्पष्ट करायला न्यायालयाने सांगितलं आहे. या प्रकरणी ईडीने तक्रार नुकतीच न्यायालयात दाखल केली, त्यावर नोटीस जारी करायला विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी गेल्या आठवडयात नकार दिला आणि त्यातल्या त्रुटी दूर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रं सादर करावीत, असं ईडीला सांगितलं होतं.
Source – AIR
