Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

ठरलं! ७ मार्च ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार अयोध्येला

ठरलं! ७ मार्च ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार अयोध्येला

मुंबई: विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर अगदी नाट्यमयरीत्या राज्यात शिवसेना प्रणित महाशिवआघाडीचे सरकार आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण शिवछत्रपतींचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ला व तदनंतर अयोध्येतील प्रस्तावित राममंदिराच्या जागेला भेट देऊ अशी घोषणा केली होती. त्यातील पहिल्या ठिकाणची भेट त्यांनी गेल्याच महिन्यात दिली.

आता राहिलेल्या दुसऱ्या ठिकाणी म्हणजे अयोध्येतील प्रस्तावित राममंदिराच्या ठिकाणाला येत्या मार्च महिन्यातील ७ तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेट देणार असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी जाहीर केले. याबाबतचे एक ट्विट त्यांनी थोड्याच वेळापूर्वी केले. मुख्यमंत्र्यांच्या फोटो सकट आयोध्यामे जल्लोष असे यात लिहिले आहे. तत्पूर्वी दोन दिवसांपूर्वी काँग्रेसतर्फे सचिन सावंत यांनीही अयोध्येत राममंदिर व्हावे अशी आमचीही इच्छा असल्याचे म्हटले होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *