छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या माता-पित्याचे स्मरण करत उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
मुंबई: मुंबईतील शिवतीर्थावर अतिशय दिमाखदार सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे २९वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील व छगन भुजबळ आणि काँग्रेस च्या नितीन राऊत व बाळासाहेब थोरात यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
यावेळी विविध क्षेत्रातील नामवंत मंडळींनी हजेरी लावली होती. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष ठाकरे, काँग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री कमल नाथ, स्वाभिमानचे राजू शेट्टी, अजित पवार, सुप्रिया सुळे, आरपीआय चे रामदास आठवले उपस्थित होते.
