Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“छत्रपतींच्या वंशजांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा” – खासदार संजय राऊत

“छत्रपतींच्या वंशजांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा” – खासदार संजय राऊत

मुंबई: ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून उठलेल्या वादळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरसांनी आपली भूमिका स्पष्ट करावे असे आवाहन काल शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी केले होते. यावरून कालच कोल्हापूर गादीचे वंशज खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी ट्विट करत संजय राऊत याचा एकेरी उल्लेख करत टीका केली होती.

आज अपेक्षेप्रमाणे संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत कालच्या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला व त्यापुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसांना जे आता भाजपमध्ये आहेत त्यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा सल्ला त्यांनी दिला. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचा आम्ही आदर करतो असेही म्हटले. पुढे त्यांनी असेही म्हटले की मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी आपली पत्रकार परिषदेपूर्वी सविस्तर चर्चा झाली ज्यात त्यांनी आपण मांडत असलेली भूमिका योग्य असून ती तशीच ठेवावी असेही म्हटले असल्याचे ते यावेळी म्हणाले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *