March 11, 2026

महाराष्ट्र

Maharashtra

साडेसहा लाख शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पोहोचवले खते आणि बियाणे – कृषिमंत्री दादाजी भुसे मुंबई: कोरोनाच्या काळात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बांधावरच खते, बियाणे पुरविण्याच्या कृषि विभागाने केलेल्या प्रयत्नामुळे आतापर्यंत १ लाख ९७ हजार मेट्रिक टन खते तर १ लाख १८ हजार क्विंटल बियाणे आणि ३ लाख ५३ हजार कापूस बियाण्यांच्या पाकिटांचा पुरवठा करण्यात आला आहे. सुमारे ६ लाख ६३ हजार शेतकऱ्यांपर्यंत कृषि निविष्ठांचा पुरवठा झाला असून त्यासाठी राज्यभरात ५६ हजार २१६ शेतकरी गट कार्यरत असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन असल्याच्या काळात राज्यात खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी कृषिमंत्री, सचिव, आयुक्त यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सातत्याने बैठका घेऊन खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. खरीपाकरिता कृषि निविष्ठा खरेदीसाठी शेतकऱ्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कृषि विभागाच्या माध्यमातून शेतकरी गटांमार्फत बांधावरच खते, बियाणे देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले....