Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आज कोकण दौऱ्यावर; निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची करणार पाहणी

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आज कोकण दौऱ्यावर; निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची करणार पाहणी

मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे आज, शनिवार (१३ जून) रोजी एक दिवसाच्या कोकण दौऱ्यावर जात आहेत.

सकाळी ८.३० वाजता महसूलमंत्री हे शासकीय निवासस्थान रॉयलस्टोन येथून मोटारीने निघून ९.०० वाजता भाऊचा धक्का येथे पोहोचतील त्यानंतर रोरो बोटीने मांडवा जेट्टी येथे जातील तेथून मोटारीने अलिबाग तालुक्यातील नागांव व चौल गावाला भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करतील त्यानंतर काशीद व नंतर मुरुड येथे भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील.

दुपारी १.१० वाजता महसूलमंत्री अधिकऱ्यांशी चर्चा करणार आहेत त्यानंतर आगरदांडा येथे आगमन व रोरो बोटीने दिघी बंदराकडे प्रयाण करतील त्यानंतर दिवे आगार, तुरुंवडी या भागातील नुकसानीची पाहणी महसूलमंत्री करतील व ४.३० वाजता मोटारीने मुंबईकडे प्रयाण करतील.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *