Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

भाजप विक्रोळी महिला महामंत्री श्रुती घोगळे यांच्या पुढाकाराने रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न

भाजपकडून विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना बूस्टर डोस

विक्रोळी, दि.२२: राज्यात विशेषतः कोकण किनारपट्टीवरील सर्व जिल्ह्यांत नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईतील विक्रोळी परिसरात भारतीय जनता पक्षाच्या विक्रोळी विधानसभा महिला महामंत्री श्रुती घोगळे यांनी या निमित्ताने स्थानिक व्यापऱ्यांच्या सोबतीने एक कार्यक्रम आयोजित केला होता.

नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन या सणांचे औचित्य साधून विनोद घोगळे Vinod Ghogale व श्रुती घोगळे Shruti Ghogale यांच्या तर्फे परिसरातील रहिवाश्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले. याच सोबत पारंपरिक असा नारळ फोडण्याच्या स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला.

विनोद घोगळे हे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार व भाजप नेते मनोज कोटक यांच्या खास मर्जीतले मानले जातात. कोविड च्या दोन्ही लॉकडाऊन दरम्यान त्यांनी व श्रुती घोगळे यांनी मोफत सॅनिटायझेशन पासून अन्नधान्य वाटपाचे कार्यक्रम वेळोवेळी आयोजित केले होते. विक्रोळी विभागात शिवसेनेचे विद्यमान आमदार व शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना भाजपकडून काटे की टक्कर दिली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून घोगळे यांना भाजपकडून ताकत पुरविली जात आहे. दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचेही आदरातिथ्य करण्याची संधी विनोद घोगळे यांना देण्यात आली होती हे विशेष.

आजच्या या कार्यक्रमाला देवेंद्र डोके(भाजप वॉर्ड अध्यक्ष), दीपक वाडेकर(माथाडी कामगार ई. मुं.स.), गौतम निरभवणे(महामंत्री वि.वि.), रजनी कदम(महिला अध्यक्ष वि. वि.), दिपाली गावडे(महिला वॉर्ड अध्यक्षा), केतकी सांगळे(महामंत्री म.मो.वि.वि), जयंतीलाल जैन, अमोल गावडे, रंजना मोरे, गणेश रोकडे, असिफ शेख, काशिनाथ बारामते, अजय पांडे यांच्यासह मोठया संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *