भाजपा उमेदवारांची पहिली यादी उद्या?
२०१९च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची जोरदार लगबग सुरु आहे. तसेच, अनेक पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजप शनिवारी (दि१६) आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे.
उद्या संध्याकाळी साडे चार वाजता दिल्ली येथे भाजपाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर भाजपा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या 100 उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपाच्या या पहिल्या यादीत नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, राधामोहन सिंह, सदानंद गौडा, नितिन गडकरी यांच्या उमेदवारीची घोषणा होईल, असे कळते.
