पाकिस्तानचा क्रिकेटर पंतप्रधान होतो, तर आपल्याकडे…
नागपूर येथील शिवसेना-भाजप कार्यकर्ता स्नेहमेळाव्यात लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उद्घव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर तोफ डागली़. पाकिस्तानचा क्रीकेटर पंतप्रधान होतो, तर आपल्याकडे पंतप्रधानपदाची स्वप्न पाहणारे नेते क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष होतात,
असा टोला नाव न घेता ठाकरे यांनी शरद पवार यांना हाणला़.
तसेच सध्या जालन्याच्या जागेवरील तिढा विषयी बोलताना, व्यासपिठावर बसलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे कटाक्ष टाकत रावसाहेब चिंता करू नका मी अर्जुनला (अर्जुन खोतकर) सांगतो, असे ठाकरे यांनी सांगतातच सभागृहात एकच हशा पिकला़.