अहमदनगर जिल्ह्यातल्या भाजपाच्या अंतर्गत वादावर निर्णय घेण्यासाठी संघटनमंत्री विजय पुराणिक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन होणार
अहमदनगर जिल्ह्यातल्या भाजपाच्या अंतर्गत वादावर निर्णय घेण्यासाठी पक्षाचे संघटनमंत्री विजय पुराणिक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापनकेली जाणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीतील जिल्ह्यातल्या पराभूत भाजपा उमेदवारांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात तक्रार केली होती.
त्यासंदर्भातमुंबईत पक्ष कार्यालयात आज बैठक झाली. पक्षाचे नेते देवेंद्र फडनवीस यावेळीउपस्थित होते. पक्षानं दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. त्याचा वस्तुस्थिती अहवालपुराणिक यांच्याकडे सादर केला जाईल. त्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असं पक्षाचे नेते राम शिंदे यांनी सांगितलं.
तर बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. जिल्ह्यात उद्या होणार्या जिल्हापरिषद अध्यक्षपदाच्या निवडणूकीत महाविकास आघाडीचा उमेदवार पाडण्यासाठी रणनीती आखत असल्याचं राम शिंदे म्हणाले. विशेष म्हणजे, शालीनी विखे अजून काँग्रेसमधे असल्याचं वक्तव्य सुजय विखे यांनी केलं आहे. त्या सध्या जिल्हाध्यक्ष आहेत.
(क्रेडिट – AIR)