भाजपाकडून ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; आशिष शेलार यांच्या बंधूंना मालाड पश्चिम मधून उमेदवारी
मुंबई, दि. २०: आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात प्रामुख्याने महायुती व महाविकास आघाडी यांच्यात थेट लढती होतील हे स्पष्ट आहे. सर्वात आधी कोणता पक्ष उमेदवारांची यादी जाहीर करणार याकडे सबंध राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. महायुतीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने आज आपल्या ९९ उमेदवारांची पाहिली यादी जाहीर करत एक पाऊल पुढे टाकलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठीतून उमेदवारी दिली आहे. मंत्री गिरीश महाजन जामनेरमधून तर सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील. वांद्रे पश्चिम मधून आशीष शेलार, मलबार हिलमधून मंगल प्रभात लोढा, कुलाब्यातून राहुल नार्वेकर आणि भोकर विधानसभा मतदारसंघातून श्रीजया अशोक चव्हाण उमेदवार असतील. नाशिक पूर्वमधून राहुल ढिकले तर नाशिक पश्चिमला सीमा हिरे यांना उमेदवारी दिली आहे. सोलापूर शहर उत्तरमधून विजयकुमार देशमुख आणि सोलापूर दक्षिणमधून सुभाष देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. श्रीगोंद्यातून प्रतिभा पाचपुते, देवळीतून राजेश बकाणे, चिंचवडमधून शंकर जगताप, फुलंब्रीतून अनुराधा चव्हाण, इचलकरंजीतून राहुल आवाडे, केजमधून नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिली आहे.
हे आहेत भाजपचे ९९ उमेदवार
नागपूर पश्चिम – देवेंद्र फडणवीस
कामठी -चंद्रशेखर बावनकुळे
शहादा – राजेश पाडवी
नंदूरबार- विजयकुमार गावीत
धुळे शहर – अनुप अग्रवाल
सिंदखेडा – जयकुमार रावल
शिरपूर – काशीराम पावरा
रावेर – अमोल जावले
भुसावळ – संजय सावकारे
जळगाव शहर – सुरेश भोळे
चाळीसगाव – मंगेश चव्हाण
जामनेर – गिरीश महाजन
चिखली – श्वेता महाले
खामगाव – आकाश फुंडकर
जळगाव (जामोद) – संजय कुटे
अकोला पूर्व – रणधीर सावरकर
धामगाव रेल्वे – प्रताप अडसद
अचलपूर – प्रवीण तायडे
देवली – राजेश बकाने
हिंगणघाट – समीर कुणावार
वर्धा – पंकज भोयर
हिंगणा – समीर मेघे
नागपूर दक्षिण – मोहन माते
नागपूर पूर्व – कृष्ण खोपडे
तिरोरा – विजय रहांगडाले
गोंदिया – विनोद अग्रवाल
अमगांव – संजय पुरम
आर्मोली – कृष्णा गजबे
बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार
चिमूर – बंटी भांगडिया
वाणी – संजीवरेड्डी बोडकुरवार
राळेगाव – अशोक उडके
यवतमाळ – मदन येरवर
किनवट – भीमराव केरम
भोकर – श्रीजया चव्हाण
नायगाव – राजेश पवार
मुखेड – तुषार राठोड
हिंगोली – तानाजी मुटकुले
जिंतूर – मेघना बोर्डीकर
परतूर – बबनराव लोणीकर
बदनापूर – नारायण कुचे
भोकरदन – संतोष दानवे
फुलंब्री – अनुराधा चव्हाण
औरंगाबाद पूर्व – अतुल सावे
गंगापूर – प्रशांत बंब
बगलान – दिलीप बोरसे
चंदवड – राहुल अहेर
नाशिक पुर्व – राहुल ढिकाले
नाशिक पश्चिम – सीमाताई हिरे
नालासोपारा – राजन नाईक
भिवंडी पश्चिम – महेश चौघुले
मुरबाड – किसन कथोरे
कल्याण पूर्व – सुलभा गायकवाड
डोंबिवली – रवींद्र चव्हाण
ठाणे – संजय केळकर
ऐरोली – गणेश नाईक
बेलापूर – मंदा म्हात्रे
दहिसर – मनीषा चौधरी
मुलुंड – मिहिर कोटेचा
कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर
चारकोप – योगेश सागर
मालाड पश्चिम – विनोद शेलार
गोरेगाव – विद्या ठाकूर
अंधेरी पश्चिम – अमित साटम
विले पार्ले – पराग अळवणी
घाटकोपर पश्चिम – राम कदम
वांद्रे पश्चिम – आशिष शेलार
सायन कोलीवाडा- तमिल सेल्वन
वडाळा – कालिदास कोळंबकर
मलबार हिल – मंगलप्रभात लोढा
कुलाबा – राहुल नार्वेकर
पनवेल – प्रशांत ठाकूर
उरण – महेश बाल्दी
दौंड- राहुल कुल
चिंचवड – शंकर जगताप
भोसली -महेश लांडगे
शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोले
कोथरुड – चंद्रकांत पाटील
पर्वती – माधुरी मिसाळ
शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील
शेवगाव – मोनिका राजले
राहुरी शिवाजीराव कर्डिले
श्रीगोंदा – प्रतिभा पाचपुते
कर्जत जामखेड – राम शिंदे
केज – नमिता मुंदडा
निलंगा- संभाजी पाटील निलंगेकर
औसा – अभिमन्यू पवार
तुळजापूर – राणा जगजितसिंह पाटील
सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख
अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी
सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख
मान -जयकुमार गोरे
कराड दक्षिण – अतुल भोसले
सातारा – शिवेंद्रराजे भोसले
कणकवली – नितेश राणे
कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक
इचलकरंजी – राहुल आवाडे
मिरज – सुरेश खाडे
सांगली – सुधीर गाडगीळ
