भास्कर जाधव यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड
मुंबई, दि. २५: दोन दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यात महायुतीने महाविकास आघाडीचा दणदणीत पराभव करत राज्य शकट आपल्याकडे राखला. आज महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांची बैठक उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी पार पडली. यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ नेते पदी निवड करण्यात आली. तर गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांची विधानसभा गटनेतेपदी आणि आमदार सुनील प्रभू यांची मुख्य प्रतोद पदी निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित आमदारांचा
