पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी साधला संवाद
नवी दिल्ली, दि. २: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्याच्या इराण-इस्राईल युद्धाच्या अनुषंगाने इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला. या संवादात, पंतप्रधानांनी सध्याच्या घडामोडींबद्दल चिंता व्यक्त केली तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यावर भर दिला. शत्रुत्व लवकरात लवकर संपुष्टात यावे यासंदर्भातील भारताच्या भूमिकेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी पुनरुच्चार केला.
