“युतीच्या १६५ पेक्षा जास्त जागा निवडून येतील आणि सरकार आपलंच येईल” – चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर, दि. १८: नागपुरातील कामठी येथे आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांच्यासाठी निवडणूक प्रचाराची सांगता सभा केंद्रीय मंत्री भाजप नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी ते म्हणाले कि, “ही विधानसभा निवडणूक माझ्यासाठी विशेष आहे. कारण, या निवडणुकीत मी स्वतः तर उभा आहेच, पण त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र चा अध्यक्ष असल्याने माझ्यावर राज्यभरातील महायुतीच्या जास्तीत जास्त उमेदवारांना निवडून आणण्याची देखील जबाबदारी आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपत असताना कामठीच्या सांगता सभेत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील भाजपा – महायुती सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडताना काँग्रेस व महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. तसेच, बावनकुळे यांना चांगल्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन उपस्थित जनसमुदायाला केले.
Source – AIR
