Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘बारामतीच्या करामती तुम्ही उचला सतरंज्या’, कविता कूल यांची पवार आणि परिवारावर व्यंगचित्रातून मार्मिक टीका

‘बारामतीच्या करामती तुम्ही उचला सतरंज्या’, कविता कूल यांची पवार आणि परिवारावर व्यंगचित्रातून मार्मिक टीका

बारामती : चालू लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी विविध राजकीय पक्षांनी सोशल मीडियाचा वापर करताना त्यात थोडी सृजनशीलता दाखवली आहे. प्रचारात व्यंगचित्रांचा वापर हा जवळपास सर्व पक्ष प्रभावीपणे करत आहेत. काही त्यामार्फत आपल्या प्रतिस्पर्ध्याला शालजोडीतले ही लगावत आहेत.

असेच काहीशी उपहासात्मक टीका बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन कूल यांनी केले आहे. आज त्यांनी एक व्यंगचित्र ट्विट केले आहे ज्यात त्यांनी एका बाजूला पवार परिवारातील सर्व सदस्य उतरत्या क्रमाने दाखवले आहेत व त्यांच्या इच्छा त्यावर लिहिल्या आहेत. सुरुवात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून केली आहे. त्यावर लिहिले आहे ‘मी पंतप्रधान होणार’. पुढे असेच अजित पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार, रोहित पवार व पवार घराण्यातील अन्य सदस्य उतरत्या क्रमाने दाखवले आहेत. आणि एक बाजूला काकडे, तावरे, निंबाळकर..इत्यादी आडनावांची माणसे दाखवली आहेत. या व्यंगचित्रात वर या सर्वांना उद्देशून ‘बारामतीच्या करामती तुम्ही उचला सतरंज्या’, असे लिहिले आहे. यासोबत त्यांनी एक ट्विटही केले आहे त्यात त्या म्हणतात की आपणा सर्वांना बऱ्याच मोठ्या काळाने ही योग्य वेळ व संधी मिळाली आहे हा प्रकार थांबवण्यासाठी. यातून कांचन कूल यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना सूचक साद घातली आहे व त्यांच्या वर्मावर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपनेही बारामतीची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. आज अमित शहा यांनी प्रचार सभा घेत त्याची पुष्टीच केली आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *