डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग गेट्स फाऊंडेशनच्या गोलकिपर्स चँपियन्स पुरस्काराने सन्मानित
गडचिरोली, दि. २४: बिल गेट्स यांच्या गेट्स फाऊंडेशनचा गोलकिपर्स चँपियन्स सन्मान ‘सर्च’ संस्थेचे संस्थापक डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांना काल न्यूयॉर्क येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. ‘सर्च’ सह जगभरातल्या दहा संस्थांना यावेळी सन्मानित केलं. बंग दांपत्याने सार्वजनिक आरोग्य आणि विशेष करून बालमृत्यू रोखण्यासाठी केलेल्या कल्पक उपाययोजनांची दखल घेत हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. बालआरोग्यासाठी सामुदायिक प्रयत्न करणाऱ्या डॉ. नवीन ठाकेर यांचाही समावेश आहे. याच कार्यक्रमात स्पेनच्या राष्ट्राध्यक्षांनाही ग्लोबल गोलकीपर हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
Source – AIR
