बाळासाहेबांच्या स्मारकासाठी एकही झाड तोडू नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश
औरंगाबाद/मुंबई: औरंगाबाद महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रियदर्शनी उद्यानातील होऊ घातलेल्या दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ४०० झाडांची कत्तल करावी लागणार होती. पण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बाळासाहेबांच्या स्मारकासाठी एकही झाड न तोडण्याचा आदेश दिला. या संदर्भात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी उभरत्या गायिका अमृता फडणवीस यांनी काल एक ट्विट करत शिवसेनेला ढोंगी म्हटले होते. तसेच त्यांनी थेट या विषयात शिवसेना कमिशन खाते असा थेट आरोप केला होता.