Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

अमिताभ आणि तापसी पन्नू यांच्या रहस्यमयी बदला चित्रपटाचा ट्रेलर पहा

Featured Video Play Icon

बदला TRAILER !

सुजॉय घोष दिग्दर्शित ‘बदला’ या सिनेमाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. ‘पिंक’ सिनेमानंतर ‘बदला’ या सिनेमामध्ये
अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकान समोर एकत्र झळकणार आहे.

‘बदला’ या सिनेमाची निर्मिती शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेन्मेंटने अजूर एंटरटेन्मेंटसोबत मिळून केली आहे. या सिनेमाचा बराचसा भाग हा परदेशात चित्रित करण्यात आला आहे.

‘बदला लेना हर बार सही नही होता, लेकीन माफ कर देना भी हर बार सही नही होता,’ या अमिताभ यांच्या भारदस्त आवाजातील संवादाने ट्रेलरची सुरुवात होते. पिंक सिनेमानंतर या सिनेमातसुद्धा बिग बी पुन्हा एकदा वकीलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तापसी पन्नूला एका खूनाच्या गुन्ह्यातून वाचवण्यासाठी बिग बी प्रयत्न करत आसल्याचे या ट्रेलर मध्ये दिसत आहे. ‘बदला’ या सिनेमाची कथा अत्यंत
रहस्यमयी असल्याचं ट्रेलर पाहून जाणवतं. येत्या ८ मार्च रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपट गृहात येतोय.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *