अखेर रामलल्लालाच मंदिर बनणार; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
राजकीयदृष्ट्या संवेदनशील राहिलेल्या राम जन्मभूमी-बाबरी मस्जिद प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाने आज सर्वसंमतीने (५-०) ऐतिहासिक निर्णय सुनावला आहे. आपल्या निकालात वादग्रस्त जागेवर सरकारला राम मंदिर बांधण्याला परवानगी देत मुस्लिम समाजाला मस्जिद बांधण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहे.
मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एसए बोबडे, दिवाई चंद्रचूड, अशोक भूषण आणि एस अब्दुल नजीर यांच्या खंडपीठाने ४० दिवस मॅरेथॉन सुनावणी केल्यानंतर १६ ऑक्टोबर रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता.
