राज्यपाल कोश्यारिंनी दिले भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण; सोमवार पर्यंत बहुमत करावे सिद्ध
सत्ता स्थापनेसाठी आज राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला निमंत्रण दिले आहे. याच सोबत कोश्यारी यांनी भाजपला ११ नोव्हेंबर म्हणजे परवा सोमवार पर्यंत बहुमत सिद्ध करायला सांगितलं आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की राज्यपालांकडून आलेल्या निमंत्रणावर भाजपच्या कोर कमिटी च्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.
पण या निमंत्रणामुळे घोडेबाजार होण्याच्या शक्यतेमुळे शिवसेना आणि काँग्रेसने आपल्या आमदारांना अनुक्रमे मुंबई व जयपूर येथील हॉटेल मध्ये मुक्कामाला हलवले आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात….
