२०३० साला पर्यंत एकूण १२ अब्ज ७० कोटी डॉलर्स ची गुंतवणूक करण्याचा ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसचा चा नि:श्चय
मुंबई, दि. १८: ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसने भारतात वर्ष २०३० पर्यंत १२ अब्ज ७० कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना जाहीर केली आहे. या नियोजित गुंतवणूकीमुळे भारतातल्या डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात अंदाजे एक लाख ३१ हजार सातशे पूर्ण वेळ नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होतील. क्लाऊड प्लॅटफॉर्म ही स्टोरेज, रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात २०० हून अधिक सेवा पुरवते. भारतामध्ये येणाऱ्या या प्रस्तावित गुंतवणुकीमुळे या क्षेत्राला मोठी उभारी मिळणार आहे. मागच्याच महिन्यात सिस्को सिस्टीम या कंपनीने त्यांच्या जागतिक पुरवठा साखळीत विविधता आणण्यासाठी भारतात उत्पादन सुरू करण्याची घोषणा केली आहे.
