Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

दुचाकी कर्ज मिळवू इच्छिणार्‍यांना एल अॅण्ड टी फायनान्सचे ‘प्लॅनेट अॅप’ ठरतेय फायदेशीर

एल अॅण्ड टी फायनान्सतर्फे टू-व्हीलरसाठी प्लॅनेट अॅपच्या माध्यमातून ग्राहकाभिमुख कर्जप्रक्रिया

· प्लॅनेट अॅपच्या डिजिटल प्रक्रियेद्वारे दुचाकी कर्ज मिळू शकते

· ग्राहकांच्या सोयीनुसार ५ सोप्या टप्प्यांमध्ये कर्ज वितरित केले जाते

· कमी दरात कर्ज दिले जाते आणि त्यावर प्रक्रिया आणि दस्तऐवजीकरण शुल्क शून्य असते

मुंबई, दि. १८: एल अॅण्ड टी फायनान्स होल्डिंग लिमिटेडची उपकंपनी असलेली आणि अग्रगण्य नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी एक असलेल्या एल अॅण्ड टी फायनान्स लिमिटेडने (एलटीएफ) पर्सन्लाईज्ड् लेंडीग अॅण्ड असिस्टेड नेटवर्क्स (प्लॅनेट) या ॲपद्वारे दुचाकी वाहनांसाठी कर्जपुरवठा क्षेत्रातील आपला प्रवास सुरू केला आहे. अॅपवरील अवघ्या पाच टप्प्यांच्या प्रक्रियेच्या सहाय्याने ग्राहक दुचाकी वाहनासाठी कंपनीकडून कर्ज प्राप्त करु शकतात.

या ॲपच्या माध्यमातून ग्राहक त्यांच्या आवडीची नवीन दुचाकी निवडू शकतात, आवश्यक कागदपत्रे अपलोड करू शकतात आणि नो युवर कस्टमर (केवायसी) ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. अॅपद्वारे, ग्राहक चाचणी ड्राइव्हसुध्दा बुक करू शकतात आणि निवडलेल्या दुचाकीची होम डिलिव्हरी देखील मिळवू शकतात. ही सर्व प्रक्रिया ते घरातूनच त्याच्या सोयीनुसार करु शकतात.

प्लॅनेटॲपच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाबाबत बोलताना एल अॅण्ड टी फायनान्स होल्डिग लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दीनानाथ दुभाषी म्हणाले,आम्ही लक्ष्य २०२६ ही योजना जाहीर केल्यापासून, आमच्या ग्राहक-केंद्रित सेवा अतिशय वेगाने वाढवत आहोत. आमचे वित्तीय व्यवहारांबाबतचे तंत्रज्ञान अधिकाधिक व्यापक आणि मोठे होण्यासाठी वचनबद्ध आहोत. आमचे प्लॅनेट अॅप हे या वचनबद्धतेचाच एक मुख्य घटक आहे. प्लॅनेट अॅपच्या माध्यमातून कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या आमच्या ग्राहकांसाठी अर्जासाठी प्रारंभापासून शेवटपर्यंत डिजिटल प्रवास सुरू केला आहे. दुचाकीसाठी वित्तसहाय्य घेणाऱ्या ग्राहकांसाठी ही सुविधा आता आम्ही विस्तारित आहोत. किंबहुना, हा प्रवास ग्राहकांच्या सोयीशी निगडीत आहे. त्यामध्ये दुचाकी ग्राहकानी चाचणी ड्राइव्ह बुक करण्यापासून ते त्यांनी निवडलेले वाहन त्यांच्या घरी पोहोचवण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास समाविष्ट असतो. अॅपवरील हा अतिशय सोपा प्रवास आमच्या ग्राहकांना त्यांच्या मोबाईल फोनचा वापर करून कोणत्याही ठिकाणाहून त्वरीत आणि सोयीस्करपणे दुचाकी कर्ज मिळवून देतो.”

प्लॅनेट अॅप एक वर्षापूर्वी सुरु करण्यात आले होते. तेव्हापासून, कंपनीच्या कर्जमागणीच्या उलाढालीत वाढ करण्यासाठी हे अॅप एक डिजिटल कणा म्हणून काम करत आहे. या अॅपने अल्पावधीतच २५ लाखांहून अधिक डाउनलोड्स ओलांडल्या आहेत आणि गुगल प्ले स्टोअरवर सातत्याने ४.५ गुणांकन प्राप्त करत आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *