Arun Gawali FB
कुटुंबाला भेटण्यासाठी डॅडीला हवी काही दिवसांची रजा
अंडरवर्ल्डचा नावाजलेला डॉन माजी आमदार अरुण गवळीला आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी काही दिवसांची सुट्टी पाहिजे आहे. म्हणून त्यांनी २८ दिवसांची संचित रजा मिळण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने कारागृह विभागाला नोटीस पाठवली आहे.
शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर खून प्रकरणात नागपूर मध्यवर्ती कारागृहात अरुण गवळी सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. मुंबईत आल्यापासून त्याने पत्नीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी, मुलाचे लग्न, आईचा मृत्यू अशाप्रसंगी अनेक वेळी कधी संचित रजा, तर कधी अभिवचन रजा घेतली आहे.
आता त्याने पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेऊन परिवाराला भेटण्याकरिता २८ दिवसांची संचित रजा मिळावी, अशी विनंती केली आहे. अरुण गवळी यांच्याकडून ऍड. मीर नगमान अली यांनी उच्च न्यायालयात बाजू मांडली. गवळीने २८ दिवसांची संचित रजा मिळावी, असा अर्ज विभागीय आयुक्तांकडे केला होता. परंतु, अर्ज फेटाळण्यात आल्याने त्याने आता हायकोर्टात धाव घेतली आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने कारागृह प्रशासनाला नोटीस बजावली आहे.
