Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

असेल हिम्मत तर सामील व्हा….धावा निरोगी स्वास्थासाठी

असेल हिम्मत तर सामील व्हा….धावा निरोगी स्वास्थासाठी

सध्या वाढत्या शहरीकरणाच्या रेट्यात लोकांचे स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होत आहे. सगळे खूप व्यस्त आहेत, जेवणाच्या वेळाही बदलेल्या आहेत. पण त्याचवेळेला एक सकारात्मक चित्र आपल्याला हळूहळू पाहायला मिळतंय. लोक धावणे, चालणे या व्यायाम प्रकारांसाठी रोजच्या दिनचर्येतला एक विशिष्ट वेळ काढून ठेवत आहे. मुंबई व नवी मुंबई सारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरात अशी फिटनेसला महत्व देणारी माणसे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात.

टीम ET मॅरेथॉन
टीम ET मॅरेथॉन         Registration On : www.eventtimes.in
अधिक माहितीसाठी : 91-9819280471

त्यातच सध्या वेगवेगळ्या मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन या शहरांमध्ये मोठ्या दिमाखात करण्यात येत आहे. ह्या अशा मोठ्या स्पर्धांमध्ये लोकांना आपल्या क्षमतेची चाचपणी करता येते. तशीच एक स्पर्धा ज्वेल ऑफ नवी मुंबई, नेरुळ येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचं नाव आहे इव्हेंट टाइम्स – “इटी मॅरेथॉन 2019”. या स्पर्धेत जवळपास 2500 स्पर्धकांचा सहभाग अपेक्षित आहे. या स्पर्धेच्या आयोजक टीम पैकी स्वाती पाटील – पाटोळे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी वार्तालाप केला. ही स्पर्धा आयोजित करण्यामागचा हेतू विचारला असता त्या म्हणाल्या की, “काही वर्षांपूर्वी एका मॅरेथॉन स्पर्धेत एक स्पर्धक म्हणून धावताना लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वच वयोगटातील स्पर्धकांना आपल्या स्वास्थ्यासाठी धावताना पहिले, तेव्हा त्यांचे विशेष कौतुक वाटले. ती स्पर्धा पूर्ण केल्यानंतर जेव्हा त्यांच्या गळ्यात पदक पडत होते. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जो अद्वितीय आनंद होतो तो मी आता शब्दात वर्णन करू शकत नाही.

त्यावेळी माझ्या मनात सहजच विचार आला की, आपण एवढी वर्ष इव्हेंट मॅनेजमेन्ट च्या क्षेत्रात आहोत. अशी एखादी स्पर्धा आपण का आयोजित  करू शकत नाही? की ज्या स्पर्धेमुळे लोकांच्या जीवनात एक स्वास्थपूर्ण सकारात्मक बदल घडू शकेल. तेव्हा मी हि कल्पना आमच्या मित्रांना सांगितली. ती सर्वांना आवडली आणि तत्काळ ह्या स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरवले. येत्या १० मार्च २०१९ ला सकाळी सर्व धावपटू आपलं कसब पणाला लावणार आहेत. या स्पर्धेमध्ये हाफ मॅरेथॉन 21 किमी, 10 किमी रन, 5 किमी ड्रिम रन, 3 किमी किड्स रन अशा गटवारीत सर्व वयोगटातील व्यक्ती आपला सहभाग नोंदवू शकतात. आपल्या निरोगी शारीरिक व मानसिक स्वास्थासाठी महाराष्ट्रातील धावपटूंना आम्ही आमंत्रित करीत आहोत.”

टीम ET मॅरेथॉन
टीम ET मॅरेथॉन

तर मित्रांनो जर तुमच्यात धावण्यासाठी लागणारी #RUG “रग” असेल तर ह्या स्पर्धेत जरूर सामील व्हा !

तुम्ही ह्या स्पर्धेसाठी पुढील वेबसाईट वर जाऊन रेजिस्ट्रेशन करू शकता.

२८ फेब्रुवारी हि शेवटची दिनांक आहे. Registration On : www.eventtimes.in

अधिक माहितीसाठी : 91-9819280471

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *