मुंबईसह राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीचे उमेदवारी अर्ज भरायची प्रक्रिया आजपासून सुरू
मुंबई, दि. २३: राज्यातल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीचे उमेदवारी अर्ज भरायची प्रक्रिया आज पासून सुरू होणार आहे. ३० डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार असून अर्जांची छाननी ३१ डिसेंबर रोजी होईल. २ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. निवडणूक चिन्हांचं वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी ३ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे. या सर्व महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होईल, तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
