Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जीवाची बाजी लावून कर्तव्य निभावणाऱ्या आबा सावंतसारख्या पोलिसांचा अभिमान – गृहमंत्री अनिल देशमुख

जीवाची बाजी लावून कर्तव्य निभावणाऱ्या आबा सावंतसारख्या पोलिसांचा अभिमान – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : जीवाची बाजी लावून कर्तव्य निभावणाऱ्या आबा सावंतसारख्या वाहतूक पोलिसांचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. असे गौरवोद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे काढले.

पिंपरी चिंचवड येथे मास्क न घातल्याने एका कार चालकाविरुद्ध कारवाई करत  वाहतूक पोलीस आबा सावंत यांना त्या कार चालकाने बॉनेटवर लटकवून फरफटत नेले. तरीही मोठ्या हिमतीने त्यांनी आपले कर्तव्य पूर्ण केले.

त्यांचा सत्कार  शाल व पुष्पगुच्छ देऊन गृहमंत्री महोदयांच्या ज्ञानेश्वरी या शासकीय निवासस्थानी करण्यात आला.

यावेळी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, तसेच सहाय्यक आयुक्त श्रीकांत डिसले उपस्थित होते.

देशमुख यांनी आबा सावंत यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. या घटनेबद्दल सविस्तर माहिती विचारली, आणि त्यांचे कौतुक केले. आबा सावंत हे लातूर जिल्ह्यातील किल्लारीचे रहिवासी आहेत.

आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आबा सावंत यांना १० हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिल्याचेही गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *