अमित शाह म्हणाले, महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री व निवडणुकीनंतरचे मुख्यमंत्री….
मुंबई: काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर या विषयावरील व्याख्यानासाठी मुंबई दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक महत्वाचे वक्तव्य केले आहे.
मुंबईतील गोरेगाव येथे झालेल्या कार्यक्रमा प्रसंगी आपल्या भाषणाच्या सुरवातीलाच त्यांनी “महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री व निवडणुकीनंतरचे मुख्यमंत्री” असा देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस हेच भाजपचा मुख्यमंत्री पदाचा अधिकृत चेहरा राहील यावर शिक्कामोर्तब केले. तसेच पुढे “काहीही होवो, काहीही न होवो, आमचा विजय पक्का आहे” असे म्हणत त्यांनी विरोधकांना खिजवलं. यावेळी त्यांनी शिवसेना-भाजप युतीबाबत कोणतेच वक्तव्य केले नाही.
