“अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे अत्यंत व्यथित” – गृहमंत्री अमित शाह
नवी दिल्ली, दि. २८: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दुःख व्यक्त केले आहे.
एनडीएचे ज्येष्ठ सहकारी अजित पवार जी यांना गमावल्याची बातमी ऐकून मन अत्यंत व्यथित झाले. त्यांचे निधन ही एनडीएकुटुंबासह माझी देखील वैयक्तिक हानी आहे, अशा शब्दांत गृहमंत्री शाह यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.
गृहमंत्र्यांनी ‘एक्स’वर आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी लिहिले, “आज एका अत्यंत दुःखद अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमचे एनडीएचे ज्येष्ठ सहकारी अजित पवार जी यांना गमावल्याची बातमी ऐकून मन अत्यंत व्यथित झाले आहे. अजित पवार जी यांनी गेली साडेतीन दशके ज्या प्रकारे महाराष्ट्रातील प्रत्येक वर्गाच्या कल्याणासाठी स्वतःला समर्पित केले, ते शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. जेव्हा जेव्हा त्यांची भेट व्हायची, तेव्हा ते महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करायचे. त्यांचे निधन ही एनडीएकुटुंबासह माझी देखील वैयक्तिक हानी आहे. मी पवार परिवाराप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. दुःखाच्या या प्रसंगी संपूर्ण एनडीए शोकाकुल पवार परिवारासोबत खंबीरपणे उभा आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास आपल्या चरणी स्थान देवो. ॐ शांती शांती शांती”
*
