Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर

मुंबई दि. १९: भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन २०२३-२४ मध्ये राबविण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ४० लाख रुपये निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे. महात्मा गांधी  राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरीता पात्र ठरु शकत नाहीत, अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरु केली आहे.

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या अंमलबजावणीकरिता अनुसूचित जाती प्रवगासाठी रु. ४०.०० लाख (रुपये चाळीस लाख फक्त) निधी आयुक्त (कृषी), कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध  करून देण्यात आला आहे .

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *