Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कंत्राटी कामगारांचे प्रश्न युद्ध पातळीवर सोडवणार – नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर

नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनच्या शिष्टमंडळाला आश्वासन

नवी मुंबई, दि.३: नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनच्या शिष्टमंडळाने काल दि. ३ मे रोजी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. यावेळी आयुक्त बांगर यांनी काही आश्वासनं या शिष्टमंडळाला दिली.

महानगरपालिकेतील सुमारे ७५०० हजार कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करण्याचे प्रयत्न चालू आहेत, समान काम समान वेतन लवकरच देणार, मनपाच्या कोविड १९ मध्ये कार्यरत असलेल्या सर्व कंत्राटी व कायम कामगारांना कोविड भत्ता तसेच कोविड योध्दा प्रमाणपत्र लवकरच देणार आहेत. त्याचा फायदा सिडकोने कोविड योद्धासाठी आरक्षित ठेवलेली घरे मिळवण्यासाठी होणार आहे. तसेच पाणीपुरवठा विभागातील कामगारांना कामगार विभागाचे तारतंत्री लायसन्स प्रमाणपत्र संबंधित विभागाशी चर्चा करून कुशल श्रेणी देण्यात येईल.

सर्व जलकुंभांवर सुरक्षा रक्षक, संरक्षक भिंतींची उंची वाढवून तारेचे कुंपण घालण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

त्याचबरोबर कंत्राटी कामगारांचा सामुहिक विमा उतरवण्यात येईल तसेच आरोग्य विभागातील सफाई कामगारांना बहुउद्देशीय काम सांगू नये किंवा ह्या कामगारांना बहुउद्देशीय कामगारांसारखे वेतन देण्याबाबत संबंधित विभागाशी लवकरच चर्चा करु असे आश्वासन देखील आयुक्तांनी नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनच्या शिष्टमंडळाला दिले. ह्या शिष्टमंडळामध्ये युनियनचे संघटक प्रमुख बाळकृष्ण खोपडे, युनियनचे सह सचिव नरेंद्र वैराळ, तसेच कामगार प्रतिनीधी राजेश बंगेरा उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *