जाणून घ्या युवासेनेच्या ‘आदित्य संवाद’ कार्यक्रमाविषयी
मुंबई: राज्यातील तरुण- तरुणींच्या आशा, आकांक्षा व अडचणी योग्य प्रकारे समजून घेण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उद्यापासून (२ एप्रिल) औरंगाबाद येथून ‘आदित्य संवाद’ या कार्यक्रमाद्वारे युवकांशी संवाद साधणार आहेत.
‘आदित्य संवाद’ या मोहिमे अंतर्गत आदित्य ठाकरे राज्यातील प्रमुख शहरात जात लाखो युवकांशी सवांद साधणार आहेत. ‘आदित्य संवाद’ हा राज्यातील पहिलाच असा उपक्रम आहे जो आदित्य आणि राज्यातील लाखो युवकांच्या दरम्यान दोन बाजूने संप्रेषण मंच स्थापन करण्याचा प्रयत्न करीत आहे. आदित्य संवाद मोहिमेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे थेट ६ लाख व डिजिटल पातळीवर १५ लाखांहून अधिक युवकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहेत.
‘आदित्य संवाद’ या मोहिमे अंतर्गत आदित्य ठाकरेंचा पहिला कार्यक्रम उद्या सरस्वती भवन महाविद्यालय, औरंगाबाद येथे सायंकाळी ५ वाजता होणार आहे. त्यानंतर नाशिक मध्ये ०७ एप्रिल, कोल्हापूरमध्ये १३ एप्रिल, मुंबईमध्ये २१ एप्रिल शेवटचा कार्यक्रम पिंपरी- चिंचवड येथे २४ एप्रिल रोजी होणार आहे.
राज्यातील १८ ते ३५ वयोगटातील युवकांसाठी हा कार्यक्रम खुला आहे. तसेच ज्यांना या कार्यक्रमात येण्याचे स्वारस्य आहे ते www.aditysanvad.com याद्वारे नोंदणी देखील करू शकतात. या कार्यक्रमामध्ये तुम्ही थेट आदित्य ठाकरेंना प्रश्नदेखील विचारू शकतात.
औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, मुंबई, पिंपरी- चिंचवड या पाच शहरांमधील ४ हजार महावियालयांमध्ये युवासेनेने महावियालयीन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश दिला आहे.
