Soldier Salute
महाराष्ट्रातील वीरपुत्रांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार
गुरुवारी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर भ्याड दहशतवादी हल्ला झाला. या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले आहेत. मलकापूरचे असलेले संजय राजपूत आणि लोणार तालुक्यातील चोरपांग्राचे नितीन राठोड या हल्ल्यात शहीद झाले.
आज एअर फोर्सच्या विशेष विमानाने या दोन्ही जवानांचे पार्थिव दिल्लीहून औरंगाबाद येथे आणण्यात येणार आहे. औरंगाबाद विमानतळावरुन या दोन्ही वीरपुत्रांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी बुलढाण्यात आणले जाईल. त्यानंतर या दोन्ही जवानांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र सरकारने या दोन जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत जाहीर केली आहे.
