कोरोनामुळे क्वालालांपूर विमानतळावर अडकलेल्या मराठी मुलांसह २०० भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने दोन विमानांना दिली मंजूरी
नवी दिल्ली: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे क्वालालांपूर विमानतळांवर अडकलेल्या २०० भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारनं दिल्ली आणि विशांखापट्टनंम साठी एअर एशियाच्या उड्डानाना मंजूरी दिली आहे.
या २०० जणांमध्ये बहुतांश भारतीय विद्यार्थी असून त्यांना क्वालालांपूर विमानतळावर कठीण परिस्थितीला सामोरे जावं लागत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
त्यांनी या २०० भारतीयांना एअर एशिया विमान कंपनीशी संपर्क साधण्यास सांगितलं आहे. भारतानं तुर्की, ब्रिटनसह, युरोपीयन देशांमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. तसंच अफगाणिस्तान, फिलिपिन्स आणि मलेशिया या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनाही भारतात प्रवेश करता येणार नाही.
