ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हाती कमळ, काँग्रेसनेते चिंतेत
नवी दिल्ली: राहुल गांधी यांचे निकटवर्तीय राहिलेले मध्यप्रदेश काँग्रेस मधील दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाला सोड चिठ्ठी दिल्यानंतर अपेक्षेप्रमाणे भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. त्यांची पुढील वाटचाल कशी असणार आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण शिंदे समर्सथक आमदारांच्या मदतीने भाजप मध्यप्रदेश विधानसभेवर आपला झेंडा फडकविणार हे जवळपास निश्चित आहे.
