सामनातील ‘नाणार रिफायनरी’च्या जाहिरातीवरून माजी खासदार निलेश राणेंची सेनेवर बोचरी टीका
मुंबई/रत्नागिरी : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना च्या मुख्य पानावर आज चक्क नाणार रिफायनरी ची भलामण करणारी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या वर सेना विरोधकांनी सडकून टीका केली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी खासदार निलेश राणे यांनी यावरून शिवसेनेवर बोचरी टिका करणारे एक ट्विट केले आहे.
आपल्या ट्विट मध्ये ते म्हणतात की, “पैशासाठी हे लोकं विकले जातात हे आम्ही वारंवार सांगतो. नाणार रिफायनरीला तीव्र विरोध केला, तरुण व माता-भगिनीनी आंदोलन करत केसेस अंगावर घेतल्या पण नेहमीप्रमाणे यु टर्न घेत ज्या कोकणाने शिवसेनेला भरभरून दिलं त्यांच्याशीच परत गद्दारी केली. जगात एवढं नीच राजकारण कोणी करू शकत नाही.”
आजच्या सामनातील जाहिरातीवर शिवसेना काय स्पष्टीकरण घेते याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
पैशासाठी हे लोकं विकले जातात हे आम्ही वारंवार सांगतो. नाणार रिफायनरीला तीव्र विरोध केला, तरुण व माता-भगिनीनी आंदोलन करत केसेस अंगावर घेतल्या पण नेहमीप्रमाणे यु टर्न घेत ज्या कोकणाने शिवसेनेला भरभरून दिलं त्यांच्याशीच परत गद्दारी केली. जगात एवढं नीच राजकारण कोणी करू शकत नाही. pic.twitter.com/RbO8KOJqp3
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 15, 2020
