चंद्रकांत पाटील यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड
भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पुनः एकदा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून मुंबई भाजप अध्यक्ष म्हणून मंगलप्रभात लोढा यांना कायम ठेवण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दोघांची निवड झाल्याचे पत्र प्रसिद्ध केले आहे.
