Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आता गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची खैर नाही, पक्षाच्या वेबसाईटवर द्यावा लागणार तपशील : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

आता गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची खैर नाही, पक्षाच्या वेबसाईटवर द्यावा लागणार तपशील : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

नवी दिल्ली: राजकारणाच्या गुन्हेगारीकरणावर आज सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय ऐकवला. न्यायालयाने या प्रकरणी चिंता व्यक्त करत तमाम राजकीय पक्षांना निर्देश दिले की गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना उमेदवारी दिल्या दिल्या ४८ तासांच्या आत त्यांची तपशीलवार माहिती पक्षाच्या संकेतस्थळावर टाकण्यात यावी. न्यायालय म्हणाले की, “मागील चार लोकसभा निवडणुकांत यात वाढ झाली आहे.”

न्यायमूर्ती एफ. नरिमन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने राजकिय पक्षांना असेही निर्देश दिले की राजकीय पक्षांनी अशा उमेदवारांचे तपशील फेसबुक व ट्विटर सारख्या समाजमाध्यमांवर शेअर करावेत. तसेच एका स्थानिक व राष्ट्रीय वृत्तपत्रात या विवरणाला प्रकाशित करावे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी स्वागत केलं. ते म्हणाले की, “हा निर्णय योग्य आहे. राजकारणात गुन्हेगार आले आहेत आणि जनतेला हे जाणून घेणे गरजेचे आहे व सोबत त्यांनी राजकीय पक्षांना प्रश्न विचारणे गरजेचे आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *