“त्या पुस्तकाशी भाजपचा काहीही संबंध नाही” वादग्रस्त पुस्तकाबाबत प्रकाश जावडेकरांनी ट्विटरवरून स्पष्ट केली भूमिका
नवी दिल्ली: दोन दिवसांपूर्वी भाजपच्या दिल्लीतील कार्यालयात प्रकाशित झालेल्या जय भगवान गोयल लिखित “आज के शिवाजी नरेंद्र मोदी” या पुस्तकावरून उठलेल्या वादळावर भाजपतर्फे अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली आहे. माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल रात्री ट्विटरवरून पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते आपल्या ट्विट मध्ये म्हणतात, “नुकत्याच प्रकाशित पुस्तकाचा भाजपशी काहीही संबंध नाही. भाजपच्या कार्यक्रमाचाही तो भाग नव्हता. लेखकाने क्षमा मागितली असून पुस्तकही मागे घेण्यात आले. हा वाद आता संपला आहे.”
पुढे ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज महान शासक होते. लोककल्याणासाठी शिवाजी महाराजांनी अथक परिश्रम केले. अनेक शतकानंतरही त्यांची चिरंतन प्रेरणा आजही कायम आहे. त्यांची तुलना इतर कुणाशीही होवू शकत नाही.”
या स्पष्टीकरणावर नाराज असलेल्या शिवप्रेमींकडून थेट पत्रकार परिषद घेत याबाबत भाजप आपली भूमिका का स्पष्ट करत नाही असा सवाल केला आहे.
