शिवसेना-राष्ट्रवादी दोघे अडीच-अडीच वर्षे वाटून घेऊ शकतात मुख्यमंत्रीपद
मुंबई: महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची मिळून महाशिवआघाडी करण्याच्या कामाने आता थोडा जोर घेतल्याचे पाहायला मिळत आहे. काल काँग्रेस चे ज्येष्ठ नेते व सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय अहमद पटेल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी आघाडी बनवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे कळते.
आज अहमद पटेल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करणार असून यानंतर या नव्या आघाडीत सामील होण्याबाबत निर्णय होऊ शकेल. महाशिवआघाडीचा नवा फॉर्म्युल्या मध्ये राष्ट्रवादीने समसमान वाटपाचे सूत्र वापरावे अशी मागणी केली असून राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पदही अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याबाबतचा प्रस्ताव ठेवला असून उद्धव ठाकरे या मागणीबाबत सकारात्मक असल्याचे कळते.
