भाजप काँग्रेसच्या आमदारांवर दबाव टाकत असून कोट्यवधीची आमिष दाखवत आहे: विजय वडेट्टीवार
मुंबई: भाजपकडून काँग्रेसच्या आमदारांवर दबाव टाकण्यात येत असून कोट्यवधी रुपयांची आमिष त्यांना दाखवण्यात येत आहेत असा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच शिवसेना आमदारांनाही ५० कोटी रुपयांपर्यंतच्या ऑफर देण्यात येत आहेत असेही एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना ते म्हणाले.
पुढे काँग्रेस आमदारांच्या जयपूर दौऱ्याबाबत ते म्हणाले की, “आमचे जे आमदार फुटायचे होते ते आधीच फुटून गेले असून आता आमचे कोणतेच आमदार फुटणार नाहीत. तसेच जे आमदार जयपूर ला गेले आहेत ते पर्यटनासाठी गेले आहेत.”
