भाजप महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न करत आहे; संजय राऊत यांचा भाजपवर थेट आरोप
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या रोजच्या शिरस्त्याप्रमाणे आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. याचसोबत लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांसोबत सत्ता वाटपाच्या ठरलेल्या ५०-५०% टक्क्यांच्या समान वाटणीच्या मुद्द्यावरही शिवसेना ठाम असल्याचे ते यावेळी म्हणाले.
शिवसेना आमदारांना रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवण्याच्या मुद्द्यावर पत्रकारांनी छेडल्यावर संजय राऊत म्हणाले की आम्हाला आमदार फुटीची चिंता नाही. पण भाजपवर त्यांनी गंभीर आरोप केला की भाजप महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचेही त्यांचे मनसुबे आहेत.
