माजी मंत्री भास्कर जाधव यांनी दिला आमदारकीचा राजीनामा
औरंगाबाद: कोकणातील श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांनी आज (शुक्रवारी) सकाळी औरंगाबाद येथे आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला. यानंतर तात्काळ विधानसभा अध्यक्षांनी तो मंजूरही केला.
नुकतीच भास्कर जाधव यांनी आपण १३ सप्टेंबर म्हणजे आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री येथे शिवसेनेत घरवापसी करणार असल्याची घोषणा केली होती. यावेळी त्यांच्यासोबत गुहागर मतदारसंघातील पंचायत समिती सदस्य व ७३ सरपंचही शिवसेना प्रवेश करणार असल्याचे ते म्हणाले होते.
