Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

भाजपच्या वाटेवर असलेल्या खासदार छत्रपती उदयनराजेंनी अचानक घेतली शरद पवारांची भेट

भाजपच्या वाटेवर असलेल्या खासदार छत्रपती उदयनराजेंनी अचानक घेतली शरद पवारांची भेट

पुणे: भाजपच्या वाटेवर असलेले राष्ट्रवादीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काल अचानक राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली.

उद्या शनिवार दि. १४ रोजी खासदार उदयनराजे भोसले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करणार असल्याचे कळते. पण तत्पूर्वी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीप्रसंगी खासदार उदयनराजें सोबत आमदार शशिकांत शिंदे व विधानपरिषदचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *